अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. तिथेही त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.Abhijit Bichukle’s entry in Hindi Bigg Boss
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉस १५ मध्ये अभिजित बिचुकलेची एन्ट्री होणार आहे.आापल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.दरम्यान अभिजीत बिचुकले वीकेंड वारमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता.
तिथेही त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.बिचुकले बिग बॉसमध्ये आपल्या वाईट भाषेसाठी आणि जबरदस्ती गोंधळ करण्यासाठी चर्चेत होता. आता तो सलमान खानच्या शोमध्ये काय धमाल करणार हे बघणं महत्वाचं ठरेल.
अभिजीत बिचुकलेला मराठी बिग बॉस शोचा स्पर्धक असताना सातारा कोर्टाकडून अटक वॉरंट जारी झालं होतं. यावेळी अभिजीत बिचुकले याला पोलीस बिग बॉस मराठी २ च्या सेटवरून घेऊन गेले होते.याच कारण म्हणजे चेक बाउंस प्रकरणात अभिजीत बिचुकले याला तुरूंगात जावं लागलं होतं..हे प्रकरण २०१५ मधील होत.