Abdul Sattar : राज्यात सेना-भाजप युती तुटून दोन वर्षे उलटून गेली आहेत. तरीही अधूनमधून दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरूच आहे. आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही युतीवर भाष्य केले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्लीत महत्त्वाच्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सेना-भाजप एकत्र आणण्याची चावी गडकरींकडे असल्याचं विधान केलं आहे. Abdul Sattar says, Gadkari has the key to bring Sena-BJP together, if Chief Minister Uddhav Thackeray is given another two and a half years
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्यात सेना-भाजप युती तुटून दोन वर्षे उलटून गेली आहेत. तरीही अधूनमधून दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरूच आहे. आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही युतीवर भाष्य केले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्लीत महत्त्वाच्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सेना-भाजप एकत्र आणण्याची चावी गडकरींकडे असल्याचं विधान केलं आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, गडकरी साहेब ज्या दिवशी मनं जुळवण्याचा खरोखर प्रयत्न करतील, त्या दिवशी नक्कीच मने जुळतील. आमचे वरिष्ठ नेते आणि गडकरी साहेब व अमित शाह यांनी पुढाकार घेतला तर नक्कीच काहीतरी घडेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेची राम-लक्ष्मणाची जोडी पुन्हा पाहायला मिळेल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, कदाचित हे होऊ शकतं. भविष्यात कदाचित असा प्रस्ताव आला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढची आणखी अडीच वर्षे देण्याचा… आता ते देणार की नाही देणार हे मी बोलणार नाही, परंतु भाजपने असा प्रस्ताव दिला, तर नक्कीच विचार होऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचा तर प्रश्नच नाही त्यांचे इतके जवळकीचे संबंध आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात कोणतेही परिवर्तन करायचे असेल तर त्याची चावी म्हणजे गडकरी आहेत, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीत पुन्हा युतीची खलबतं सुरू आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देण्यासाठी भाजप सहजासहजी तयार होणार नाही, हे तर नक्कीच. परंतु असे जर घडले तर महाविकास आघाडीची पडझड अटळ असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Abdul Sattar says, Gadkari has the key to bring Sena-BJP together, if Chief Minister Uddhav Thackeray is given another two and a half years
महत्त्वाच्या बातम्या
- चीनवर भारताचा पलटवार : चीनच्या व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून भारताने जारी केले फोटो; LAC वर तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिक तैनात
- त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला; चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका
- उत्तर प्रदेशातील बरेलीत “लडकी हूं” मॅरेथॉनमध्ये गर्दीत चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सूर्यनमस्कार आयोजनास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध; मुस्लिम विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन
- न्यायालयाने नितेश राणेंना दिला तात्पुरता दिलासा , पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही