• Download App
    AARYAN KHAN DRUGS CASE : अनन्या पांडे-आर्यन खानमध्ये काय झाली होती चर्चा? धक्कादायक चॅटिंग आली समोर...|AARYAN KHAN DRUGS CASE: What was the discussion between Ananya Pandey and Aryan Khan? Shocking chatting in front

    AARYAN KHAN DRUGS CASE : अनन्या पांडे-आर्यन खानमध्ये काय झाली होती चर्चा? धक्कादायक चॅटिंग आली समोर…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: आर्यन खान यांच्या मोबाईलमध्ये एका अभिनेत्रीसोबतचे अंमली पदार्थाबद्दलचे चॅट एनसीबीला आढळून आले होते. गुरुवारी ती अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचं समोर आलं. एनसीबीने अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेत चौकशीला बोलावलं होतं. त्या चौकशीत अनन्याला काय विचारण्यात आलं, याबद्दलची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.AARYAN KHAN DRUGS CASE: What was the discussion between Ananya Pandey and Aryan Khan? Shocking chatting in front

    आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याच्या जामीनाला विरोध केला होता. त्याचबरोबर एका अभिनेत्रीबरोबर आर्यन खान अंमली पदार्थाबद्दल बोलत असल्याचंही न्यायालयासमोर सादर केलं होतं. गुरुवारी अचानक एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरी धाड टाकली. त्यानंतर आर्यनसोबत चॅट करणारी ती अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचं समोर आलं. एनसीबीने अनन्याची गुरुवारी दोन तास चौकशी केली.



    चौकशीनंतर आता आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात काय चर्चा झाली होती, याबद्दलची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला ही माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे आर्यन खान यांच्या मोबाईलमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबतच्या चॅटमध्ये अंमली पदार्थांबद्दल विचारणा केल्याचा मजकूर आढळून आला आहे. आर्यन खानने अभिनेत्री अनन्या पांडेकडे गांजा मिळवून देण्याबद्दल विचारणा केली होती.

    चॅटमध्ये आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेला म्हणतो की, ‘गांजा मिळू शकतो का?’ त्यावर अनन्या पांडे म्हणते ‘मी व्यवस्था करते.’ एनसीबीने आढळून आलेल्या चॅटची चौकशी सुरु केली असून, यासंदर्भात गुरुवारी अनन्या पांडेला समन्स बजावण्यात आलं होतं.

    दुपारी दोन वाजता अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली. यावेळी समीर वानखेडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. यावेळी तिला या संभाषणाविषयी विचारण्यात आलं. त्यावर आपण फक्त मस्करी करत होतो, असं उत्तर अनन्याने दिलं.

    AARYAN KHAN DRUGS CASE: What was the discussion between Ananya Pandey and Aryan Khan? Shocking chatting in front

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस