Thursday, 8 May 2025
  • Download App
    कोरोना होम टेस्टिंग किट घेण्यासाठी आता आधारकार्ड असणे गरजेचे , महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती Aadhaar card is now required to get Corona Home Testing Kit, informed Mayor Kishori Pednekar

    कोरोना होम टेस्टिंग किट घेण्यासाठी आता आधारकार्ड असणे गरजेचे , महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती

     

    जर तुमची कोरिना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सांगा आणि लोकांनी घाबरू नका, कारण तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.अस देखील पेडणेकर म्हणाल्या.Aadhaar card is now required to get Corona Home Testing Kit, informed Mayor Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अजूनही कायम आहे.यादरम्यान घराच्या घरी होम टेस्टिंग किट घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले.त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , “जो व्यक्ती होम टेस्टिंग किट विकत घेत होता, तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर माहिती देत नव्हता. त्यामुळे आता होम टेस्टिंग किट घेताना आधार कार्ड आवश्यक असणार आहे. आधार कार्डशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही.”



    पेडणेकर म्हणाल्या की, १३ जानेवारी २०२२पर्यंत १ लाख ६ हजार ९८७ जणांनी स्वतःची चाचणी कोरोना होम टेस्टिंग किटद्वारे केली होती.दरम्यान यामध्ये ३ हजार ५४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.आता आधार कार्डनंबर दिल्याशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही.तसेच जर तुमची कोरिना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सांगा आणि लोकांनी घाबरू नका, कारण तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.अस देखील पेडणेकर म्हणाल्या.

    दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती मुंबईपालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.

    Aadhaar card is now required to get Corona Home Testing Kit, informed Mayor Kishori Pednekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण