विशेष प्रतिनिधी
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रावसाहेब दानवे पत्नी निर्मला दानवे आणि नात युवराज्ञीसह दमनीवर बसून फेरफटका मारत आहेत.A tourOf Raosaheb Danve through the bullak cart
करदन तालुक्यातील नळणी येथील त्यांच्या शेत शिवारावर फेरफटका मारताना दिसत आहे.रावसाहेब दानवे यांचे याआधी देखील शेतीवरील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
व्यग्र कार्यक्रमातून वेळ मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे हे आवर्जून शेतीकडे फेरफटका मारत असतात.अशातच त्यांनी त्यांनी शेतातून दमनीवर बसून फेरफटका मारला. हा प्रसंग काही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला.
– रावसाहेब दानवे यांचा दमनीतून फेरफटका
– सहकुटुंब शेतशिवारातून लुटला आनंद
– व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
– भोकरदन तालुक्यातील नळणीतील व्हिडीओ