• Download App
    मॉर्गन स्टेनलेच्या उपाध्यक्षांनी भर रस्त्यात पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले A Morgan Stanley vice president chased a mobile phone thief across the street

    मॉर्गन स्टेनलेच्या उपाध्यक्षांनी भर रस्त्यात पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले

    वृत्तसंस्था

    मुंबई : मॉर्गन स्टॅनले कंपनीचे उपाध्यक्ष सुधांश निवासकर यांनी एका मोबाईल चोराला अत्यंत नाट्यमय पद्धतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. एखाद्या सिनेमाची कथा घडावी अशी कथा प्रत्यक्ष मुंबईच्या रस्त्यावर घडली. A Morgan Stanley vice president chased a mobile phone thief across the street

    सुधांशू निवासकर (वय 41) यांनी गोरेगावच्या हब मॉल येथून चांदीवलीला आपल्या घरी जाण्यासाठी एक ऑटो रिक्षा केली. पण सायंकाळच्या वेळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर ऑटो रिक्षा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली. तिच्यातच बसून सुधांशू निवासकर हे मोबाईल पाहत होते. मोबाईल त्यांच्या डाव्या हातात होता. नेमका त्याच वेळी एक जण आला आणि त्याने सुधांशू यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन तो पळू लागला. सुधांशू यांना क्षणार्धात काय झाले हे लक्षात आले. ते देखील रिक्षातून लगेच उतरून मोबाईल चोराच्या मागे धावले. काही क्षणात त्यांनी मोबाईल चोराला गाठले. पण त्यांच्या हाताला हिसका देऊन मोबाईल चोर पुन्हा निसटला. पण सुधांशू यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. ते मोबाईल चोराच्या मागे धावत राहिले.



    भर ट्राफिक जाम मध्ये घडलेल्या या प्रसंगामुळे आजूबाजूचे लोकही सतर्क झाले. एका स्पॉटवर मोबाईलवर अडखळला आणि पडला. तोपर्यंत सुधांशू त्याच्यापर्यंत पोहोचले आणि इतरांच्या मदतीने त्याला पकडले. सुधांशू यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. तिथून जवळच असलेले पवई पोलिसांचे मोबाईल युनिट काही मिनिटातच तिथे दाखल झाले आणि मोबाईल चोराला त्यांनी अटक केली. सागर ठाकूर (वय 32) असे मोबाईल चोराचे नाव असून तो विक्रोळीच्या साकी विहार मध्ये राहतो. त्याची बाकीची गुन्हेगारी बॅकग्राऊंड पोलीस तपासत आहेत.

    A Morgan Stanley vice president chased a mobile phone thief across the street

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!