प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांपासून एका महिलेला मूल झाले आहे. याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. काही दिवसांत हे प्रकरण समोर येईल, असा इशाराही शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. A child to a woman from Sanjay Raut, will soon bring out with the video case
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट व खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेत संजय राऊत थुंकले होते. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला असून संजय राऊतांना घेरण्याची रणनीती शिंदे गट आखत असल्याचे दिसत आहे.
राऊतांची महिलेला अश्लील शिवीगाळ
आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार शरसंधान साधले. त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केला. संजय शिरसाट म्हणाले, राऊतांना आता फक्त बोलून चालणार नाही. करून दाखवावे लागणार आहे. संजय राऊतांना एका महिलेपासून मुल आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. हे प्रकरण मी लवकरच समोर आणणार आहे.
माझ्याकडे ती क्लीप
संजय शिरसाट म्हणाले, ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ इच्छित नाही. मात्र, हे प्रकरण जगजाहीर आहे. संजय राऊतांनी या महिलेला अश्लील शिवीगाळ केली होती. ती क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. माझ्याकडेही ती क्लीप आहे.
पत्राचाळींचे सर्वेक्षण करणार
संजय शिरसाट म्हणाले, याशिवाय मंगळवारी मी पत्राचाळींचे सर्वेक्षणही करणार आहे. संजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे. या प्रकरणांचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील.
कुत्र्यासोबत केली तुलना
संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षे त्यांनी काहीच काम केले नाही. आम्ही ती चूक दुरुस्त केली तर आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच काम राहिलेले नाही. संजय राऊत हे गाडीखालून चालणाऱ्या कुत्र्यासारखे आहेत. त्यांना वाटते गाडी आपणच चालवतो. पण, तसे नसते.
जनताच उत्तर देईल
संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत आता ठाकरे गट संपवत आहेत. त्यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरील आहे. त्यांनी एक तरी निवडणूक लढवली आहे का? पोट भरण्यासाठी दुसऱ्यावर टीका करणे हा त्यांचा धंदा आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य उत्तर देईल.
A child to a woman from Sanjay Raut, will soon bring out with the video case
महत्वाच्या बातम्या
- सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज
- PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
- ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी
- आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले