Sunday, 11 May 2025
  • Download App
    जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; राष्ट्रवादीसह विरोधी पक्षीय महिला नेत्यांचा राजभवनात जमावडा A case of molestation against Jitendra Awhad

    जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; राष्ट्रवादीसह विरोधी पक्षीय महिला नेत्यांचा राजभवनात जमावडा

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि राष्ट्रवादीसह विरोधी पक्ष महिला नेत्यांचा जमावळा राजभवनात पोहोचला खासदार जया बच्चन यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींनी राज्यपालांना निवेदन दिले महाराष्ट्र सह देशात महिलांचा अपमान करण्याची प्रवृत्ती वाढत आहे ही सहन केली जाणार नाही आपण राज्य सरकारला समज दिली पाहिजे अशी मागणी सर्व महिला लोकप्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली A case of molestation against Jitendra Awhad

    राज्यपालांना निवेदन देणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान माजी मंत्री अदिती तटकरे शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके आदी विरोधी पक्ष लोकप्रतिनिधींचा समावेश होता.


    महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा गुन्हा; जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा की नुसतीच हूल?


    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावर या महिला लोकप्रतिनिधींचा विशेष कटाक्ष होता जितेंद्र आव्हाड यांनी कोणताही विनयभंग केलेला नाही ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे त्या महिलेचा यामागे राजकीय हेतू आहे आव्हाडांवरील तक्रार त्यामुळे मागे घेण्यात यावी अशी मागणी या महिला लोकप्रतिनिधींनी केली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखणच केली. आव्हाड हे चांगले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून महिलांच्या विनयभंगाची कृत्य घडणारच नाही मी त्यांच्याशी सकाळीच बोलले आहे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन करून महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका केली आहे.

    हा सर्व प्रकार सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहोचले राज्यपालांनी त्यांना काही सूचना केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिले आहेत परंतु फडणवीस अथवा राजभवन येथून मात्र या संदर्भातला कोणताही अधिकृत माहिती अथवा खुलासा करण्यात आलेला नाही.

    A case of molestation against Jitendra Awhad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ