विशेष प्रतिनिधी
मुंबई : अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धी साठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे. A.B.A.S.P. Pvt. Selection of Praveen Davane
दि.२७ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते प्रा.दवणे यांची निवड करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी प्रविण दवणे यांचे नाव सुचवले व संघटन मंत्री सुनील वारे यांनी दवणे यांच्या नावास अनुमोदन दिल्यावर उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली.
अखिल भारतीय साहित्य परिषद १९६६ पासून साहित्य क्षेत्रात, राष्ट्रीय विचार घेऊन सर्व भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे. अ.भा.साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील कामाला दवणे यांच्या नेतृत्वामुळे साहित्यिक उंची प्राप्त होऊन सर्व जिल्ह्यात काम नव्याने गती घेईल.
याच बैठकीत प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांची कार्याध्यक्ष पदी, तर नितीन केळकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रा.डॉ. बळीराम गायकवाड यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तर सुनील वारे यांच्याकडे प्रदेश संघटना मंत्री अशी जबाबदारी असेल. नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या या पुढील एक वर्षासाठी असतिल.
A.B.A.S.P. Pvt. Selection of Praveen Davane
महत्त्वाच्या बातम्या
- तेलंगणात साकारले भव्य यदाद्री मंदिर , शिखर मढविले १२५ कोटीचा सोन्याने; १२०० कोटींचा खर्च
- हे भाजपचे सरकार आहे, बजरंग दल, आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) किंवा काही गटांचे नाही, भाजप आमदाराचा स्वत;च्याच सरकारला घरचा आहेर
- संघ प्रचारक, भाजक कार्यकर्ता आणि मुख्यमंत्रीपद तिन्हीचा मिळून 45 वर्षांचा अनुभव, प्रशांत किशोर म्हणाले त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितिय
- स्थलांतरीत मुसलमानांच्या पाठिंब्यावर बद्रुद्दीन अजमल २०२६ पर्यंत येऊ शकतो आसाममध्ये सत्तेवर, मुख्यमंत्री सरमा यांनीही व्यक्त केली भीती