• Download App
    साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होणार ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन97th Marathi Sahitya Samelan to be held in Amalner

    साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होणार ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

    पुण्यात पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीत झाले शिक्कामोर्तब

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आगामी ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. साने गुरुंजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे साहित्य संमेलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. पुण्यात पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 97th Marathi Sahitya Samelan to be held in Amalner

    खरंतर या संमेलनासाठी सांगलीमधील औदुंबर, सातारा आणि अमळनेर या तीन ठिकाणांमध्ये चुरस होती. शिवाय, मराठवाड्यातील जालना शहराचाही प्रस्ताव होता. मात्र यामध्ये अमळनेरची निवड झाली आहे. या अगादरचे म्हणजेच ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्धामध्ये पार पडले आहे.

    अमळनेरला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकासाचा वारसा लाभलेला आहे. सानेगुरुजींच्या वाड्मयीन कर्मभूमीत हे साहित्य संमलेन जवळपास ५०च्या दशकानंतर पहिल्यांदाच होत आहे. साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमधील सदस्यांनी प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी केली आणि त्यानंतर प्रस्तावावर निर्णय झाला.

    97th Marathi Sahitya Samelan to be held in Amalner

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस