प्रतिनिधी
सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात शिवतीर्थ परिसर विकासासाठी शिंदे – फडणवीस सरकारने 8 कोटी रुपयांचा वाढीव निधी दिला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी शिंदे – फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. 8 Crore Fund of Shinde-Fadnavis Government for Development of Satara Shivtirtha Campus
उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट अशी :
शिवप्रभुंच्या दिगंत ख्यातकिर्तीला साजेसा साताराचा शिवतीर्थ परिसर असावा म्हणून वाढीव निधी द्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केली. आमची आग्रही मागणी, सातत्याचा पाठपुरावा आणि शिवप्रेमी मुख्यमंत्री यांच्या संयोगातून 8 कोटींचा भरीव आणि भरघोस निधी शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी आजच प्राप्त झाला आहे.
सातारा नगरीला शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाची महान परंपरा लाभली आहे. शिवप्रभूंच्या या भूमीत पोवईनाक्यावरील (शिवतीर्थ) पूर्णाकृती पुतळा सातारकरांनाच नव्हे, तर येथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सातत्याने प्रेरणा देत आहे. या परिसराचे सुशोभीकरणाचे काम आम्ही हाती घेतले.
या कामास प्रथम जिल्हा नियोजन मधुन निधी सुमारे 3 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन घेतला. कामास सुरुवात करण्यात आली. तत्कालीन पालक मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे यावेळी सहकार्य लाभले.
राजधानी सातारा या नावाला साजेशा शिवतीर्थ परिराच्या सुशोभीकरण कामासाठी निधीची गरज होती. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे आम्ही सुशोभीकरणासंबंधी नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजूरी देण्याबरोबरच जलद निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी ना. शिंदे यांनी शिवतीर्थाचे सुशोभीकरणास निधी कमी पडू देणार नाही, असे ठोस आश्वासन देखील दिले.
त्या प्रमाणे आज नगरविकास खात्याने शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेमधून 8 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. अखिल समाजाला सातत्याने प्रेरणा मिळत राहण्यासाठी शिवतीर्थावरील शिवप्रभूंच्या पूर्णाकृती पुतळा परिसराचे सुशोभीकरणाला अधिक चालना मिळेल. नागरीकांना दैनंदिन जीवनात सातत्याने उर्जा देणारे चिरकालीन प्रेरणास्थान प्रभावशील उठावदारपणे सुशोभित होईल. या माध्यमातून शिवकार्याकरीता आम्हाला काही तरी थोडंफार करता आले याचा मनस्वी आनंद आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेसह सर्वांचे आभार.
8 Crore Fund of Shinde-Fadnavis Government for Development of Satara Shivtirtha Campus
हत्वाच्या बातम्या