Saturday, 10 May 2025
  • Download App
    भीषण दुर्घटना! अकोल्यात अवकाळी पावसामुळे मंदिरावरील पत्र्याच्या शेडवर झाड कोसळून सात जणांचा मृत्यू7 people dead while many injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall 

    भीषण दुर्घटना! अकोल्यात अवकाळी पावसामुळे मंदिरावरील पत्र्याच्या शेडवर झाड कोसळून सात जणांचा मृत्यू

    या दुर्घटनेत किमान ३०-४० जण जखमी झाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. अनेक ठिकाणी तर गारपीटही झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात काल सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे मंदिरवरील पत्र्याच्या शेडवर जुने झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३०-४० जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोलाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. 7 people dead while many injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall

    पारस गावात बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या शेडखाली अनेक भाविक उभे होते. त्यातील अनेक जण त्याखाली दबले गेले.

    या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, ३०-४० जण जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले.

    7 people dead while many injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Icon News Hub