Sunday, 11 May 2025
  • Download App
    पुणे पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा, जाणून घ्या भरतीसंबंधीचे नवे नियम 5th october 2021 is the new date of Pune Police Force Recruitment 2021

    पुणे पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा, जाणून घ्या भरतीसंबंधीचे नवे नियम

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना महामारीचा काळ सुरू झाला आणि सर्व जग एका जागी येऊन गोठल्यासारखे झाले होते. बऱ्याच परीक्षा आणि सरकारी नोकर्यांच्या भरतीच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता एक आनंदाची बातमी आली आहे. पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी ही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक उमेदवारांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. 5th october 2021 is the new date of Pune Police Force Recruitment 2021

    २०१९ मध्ये २१४ जागा भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी ३९३२३ उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले होते. पण गेल्या दीड वर्षापासून कोरोणाच्या साथीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने सर्व उमेदवारांना एक आशेचा किरण दिसू लागला आहे.


    पुण्याची फुकटात बिर्याणीची मागणारी महिला आयपीएस अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलीसांना प्रतिमा बदलण्याचे आवाहन


    पण २०१९ साली ह्या भरती प्रक्रीयेच्या नियमांमध्ये काही बदलही करण्यात आले होते. ह्या बदलांविरुद्ध पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस भरतीसाठी आधी शंभर गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शंभर मार्कांची लेखी चाचणी घेतली जायची. दोनशेपैकी सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जायची. पण राज्य सरकारच्या नव्या नियमांनुसार लेखी परीक्षा आधी घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मैदानी चाचणीचे गुण शंभर वरून पन्नास करण्यात आले आहेत. या निर्णयाविरुध्द अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता.

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी महिन्यात पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये केली जाणार होती. पहिल्या टप्प्यामध्ये ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पाडली जाणार होती. तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यांत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. पण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया देखील लांबणीवर पडली आहे.

    5th october 2021 is the new date of Pune Police Force Recruitment 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ