• Download App
    पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!! 593 crore development plan of Shinde-Fadnavis government for Jara society

    पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तिजोरीची चावी दिली आहे. त्यामुळे आता पैसा कमी पडू देणार नाही. बंजारा समाजासाठी 593 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून आता मी तुम्हाला शब्द देतो की, कोणतेही काम मी थांबू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला दिले आहे. तसेच विविध घोषणाही केल्या आहेत. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 593 crore development plan of Shinde-Fadnavis government for Jara society

    593 कोटी रुपयांचा आराखडा

    बंजारा समाजासाठी पैशांची कमतरचा पडू देणार नाही. 593 कोटींचा आराखडा तयार केला आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सेवालाल महाराज लढवय्ये होते, समाजावर आक्रमण झाले तेव्हा त्यांनी लढायला शिकवले तसेच त्यांनी प्रसंगी शांतीचाही संदेश दिला. त्यांनी बावीस प्रतिज्ञा समाजाला दिल्या त्या प्रतिज्ञांचा अंगीकार आपण केला पाहिजे असेही ते म्हणाले.

    फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा

    • बंजारा समाजाला शिक्षणात वंचित राहण्याची वेळ येऊ नये. मुलामुलींना शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार हे मोठे परिवर्तन येत्या काळात घडणार आहे.
    • नॉन क्रिमिलेअरची अट जर कायद्यात बसत असेल तर त्यावर निर्णय घेतला जाईल. कारण घोषणा करू आणि पूर्ण होणार नाही असे नको, त्यामुळे याप्रकरणी महाधिवक्ता यांचे मत याबाबत घेऊन मग हे काम केले जाईल.
    • वर्धा – नांदेड लोहमार्ग पोहरागड येथून न्यावा या मागणीप्रमाणे लवकरच पोहरागडमध्ये रेल्वेलाईन येणार आहे. यासाठी फडणवीसांनी पंतप्रधानांना विनंती केली होती.
    • पोहरागडवरून काशीला येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. बंजारा समाजाचा महामंडळामार्फत विकास केला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

    593 crore development plan of Shinde-Fadnavis government for Jara society

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!