विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील टाकली ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 19 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण झाली होती. ही लागण झाल्यानंतर विद्यालयातील 450 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आणि यामध्ये 33 मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
52 students of Jawahar Navodaya Vidyalaya in Ahmednagar tested positive for coronavirus
अशाप्रकारे शाळेतील एकूण 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्कूल बंद करण्यात आले आहे आणि शाळा आणि शाळेच्या आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सध्या ओमायक्रॉन या व्हेरिअंटचे पेशंट भारतात एकूण 422 आहेत. तर फक्त महाराष्ट्रामध्ये एकूण 108 केसेस ओमायक्रॉन व्हेरिएंटनी संसर्ग झालेल्या आहेत. पैकी 44 जणांनी कोरोनावर मात केलेली आहेत. बाकी लोक अजूनही उपचार घेत आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी दिली होती.
देशामध्ये असणार्या एकूण ओमायक्रॉन संसर्गाच्या संख्येत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेले नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे.
52 students of Jawahar Navodaya Vidyalaya in Ahmednagar tested positive for coronavirus
महत्त्वाच्या बातम्या
- सावरकर – हिंदुत्व – गाय : लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाच्या शिवानंद तिवारींकडून दिग्विजय सिंह यांचे समर्थन!!
- WATCH : पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
- पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला
- बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी