• Download App
    भायखळा कारागृहात तब्बल ४३ महिला कैद्यांना कोरोनाची लागण |43 women prisners affected due to corona

    भायखळा कारागृहात तब्बल ४३ महिला कैद्यांना कोरोनाची लागण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना भायखळा कारागृहात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये कारागृहातील ४३ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये चार लहान मुलांसह काही गर्भवतींचाही समावेश आहे.43 women prisners affected due to corona

    काही दिवसांपूर्वी भायखळा कारागृहात एक महिला कैदी कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर पालिकेद्वारे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या दरम्यान सहा महिला कैद्यांना ताप आला होता.



    या महिलांच्या तपासणीदरम्यान आणखी तीन महिला कैद्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर १८ सप्टेंबरला ९७ कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४३ महिला कैद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.3

    कारागृहातील महिला कैद्यांची दोन टप्प्यात तपासणी करण्यात आली. त्यात चार कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत येथे १० दिवसांत ४३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

    43 women prisners affected due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू