विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवमय वातावरणात काल कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकवण्यात आले. नुकताच कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतातून या घटनेविरूद्ध निषेध व्यक्त करण्यात आला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी ह्या कृत्यावर मत मांडताना म्हटले होते की ही घटना अतिशय क्षुल्लक घटना आहे.
40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government
त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. साउंड सिस्टीमवर महाआरती म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.
40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर