विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला चिंचवड मधील मोडी गर्ल श्रुती गणेश गावडे या तरुणीने एका वेगळ्या प्रकारे महाराजांना अभिवादन केले. भोसरी येथील आंबेडकर मैदान येथे मोडी लिपीत एक लाख अकरा हजार एकशे अकरा वेळा ‘जय शिवराय’ असे लिहीत ४० फुटी रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.40 feet rangoli of Shivaraya made in Bhosari
भारतात प्रथमतः शिवरायांची प्रतिकृती तेही मोडी लिपी मध्ये साकरण्यात आली आहे. दरम्यान महाराजांची ही नयनरम्य आणि भव्य रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत.
या कलाकृती साठी श्रुतीला सुमारे २२० किलो रांगोळी लागली आहे. इतक्या प्रचंड रांगोळीतून तिने साकारलेली ही भव्य प्रतिमाही तितकीच भव्य आहे. विशेष म्हणजे ४८ तास या रांगोळीवर केले असून अपार मेहनतीनंतर ही रांगोळी पूर्ण केली आहे. ही अनोखखी कलाकृती साकारण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे व शिवराय प्रोडक्शन यांचेही सहकार्य लाभले.
40 feet rangoli of Shivaraya made in Bhosari
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेंडेंविरोधात कोपरी ठाण्यात गुन्हा; वय लपवून बार लायनस बनवल्याचा आरोप
- Punjab Election : पंजाब निवडणुकीनंतर भाजप आणि अकाली दलाची युती होणार का? बिक्रम मजिठिया यांनी दिले हे उत्तर
- चांदीचा चमचा घेऊन जन्मले राहुल, प्रियांका आणि अखिलेश, हेच लोक जनधन खात्यांची खिल्ली उडवायचे, जेपी नड्डांचा हल्लाबोल
- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, स्नेहभोजनानंतर पवारांचीही भेट घेणार