• Download App
    ४ लाख ४२ हजार जण कोरोनामुक्त , राज्यातील सहा दिवसातील चित्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती|4 lakh 42 thousand people free from corona, picture of six days in the state; Information of Health Minister Rajesh Tope

    ४ लाख ४२ हजार जण कोरोनामुक्त , राज्यातील सहा दिवसातील चित्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ७१ हजार ७३६ रुग्णांना सोमवारी घरी सोडले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.4 lakh 42 thousand people free from corona, picture of six days in the state; Information of Health Minister Rajesh Tope

    राज्यात दोन महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळले होते.



    आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत वाढ झालेली आढळली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.

    आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

    घरी सोडलेले रुग्ण

    • २० एप्रिलला ५४ हजार २२४
    • २१ एप्रिलला ५४ हजार ९८५
    • २२ एप्रिलला ६२ हजार २९८
    • २३ एप्रिलला ७४ हजार ४५
    • २४ एप्रिलला ६३ हजार ८१८
    • २५ एप्रिलला ६१ हजार ४५०
    • २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६
    •  एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

    4 lakh 42 thousand people free from corona, picture of six days in the state; Information of Health Minister Rajesh Tope

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!