रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज २ जून रोजी रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 350 years of Chhatrapati Shivaji Maharajs coronation today
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या बोधचिन्हाचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
350 years of Chhatrapati Shivaji Maharajs coronation today
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!!
- “हा” 2013 चा भारत नाही, देशाची व्यापक आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल; मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्टचा निर्वाळा
- भाजपाचे महाजनसंपर्क अभियान; महाराष्ट्रात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभांचा धडाका
- काँग्रेसचा सगळ्यांना “समान न्याय”, जनतेला लुटण्यात भेदभाव नाय; पंतप्रधान मोदींचे अजमेर मधून शरसंधान!!