• Download App
    संतापजनक : मुंबईत 'निर्भया'सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगात रॉड, प्रकृती गंभीर । 32 Year Old Women Gang Raped In Sakinaka Area Mumbai, One Accused Arrested

    संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर

    Sakinaka Area Mumbai : ‘निर्भया’ घटनेसारखी हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाला. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 32 Year Old Women Gang Raped In Sakinaka Area Mumbai, One Accused Arrested


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘निर्भया’ घटनेसारखी हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाला. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    ही संतापजनक घटना मुंबईतील साकीनाका परिसरातील आहे. खैराणी रोडवर 30 वर्षीय महिलेवर प्रथम बलात्कार झाला आणि बलात्कारानंतर आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. या महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली.

    घटनेची माहिती मिळताच डीसीपी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त साकीनाका यांनी पोलीस ठाणे गाठले. या घटनेत आणखी आरोपींचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

    महिलेवर झालेले क्रूर कृत्य पाहून दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आता पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीची चौकशी केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण उजेडात येईल. मात्र, पोलिसांनी अद्याप जास्त माहिती दिलेली नाही.

    एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता एक फोन आला होता. त्यात मुंबईच्या साकीनाका येथील खैरानी रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले. जिथे महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात पोलिसांनी भादंविच्या कलम 376 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    32 Year Old Women Gang Raped In Sakinaka Area Mumbai, One Accused Arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!