• Download App
    गणेशोत्सव स्पेशल : पुण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 250 गाड्या!!250 trains of ST to go from Pune to Konkan

    गणेशोत्सव स्पेशल : पुण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 250 गाड्या!!

    प्रतिनिधी

    पुणे : गणेशोत्सवाला मुंबई-पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. नोकरीसाठी पुण्यात आलेल्या कोकणवासीयांना पुण्यातच 2 वर्षे गणेशोत्सव साजरा करावा लागला. 250 trains of ST to go from Pune to Konkan

    परंतु यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने चाकरमान्यांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी 250 विशेष बसची व्यवस्था पुणे एसटी विभागातर्फे करण्यात आली आहे. यासह इतर शहरांमध्ये जाण्यासाठी देखील 150 स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    – 250 विशेष बसची व्यवस्था

    कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी 170 बस नियुक्त केल्या असून त्यातील 120 बस संपूर्ण बुक झाल्या आहेत. यासह 30 बस ग्रुप बुकिंगद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. बस स्थानकावरून गणेश भक्तांसाठी 27 ऑगस्टपासून 50 स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या शहरात जाण्यासाठी 150 स्वतंत्र बसची व्यवस्था पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली आहे.

    250 trains of ST to go from Pune to Konkan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस