विशेष प्रतिनिधी
जालना : महाविकास आघाडीचे २५ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. पण अजूनही ते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve
दानवे म्हणाले, निवडणुका येऊ द्या, एक-एक करुन सगळे भाजपच्या वाघोलीत येऊन पडतील. हे आमदार कोण आहेत असा प्रश्न विचारला असता, जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं आता सांगू शकत नाही. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकांच्या तोंडावर हे नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असल्याचे दानवेंनी स्पष्ट केलं.विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडीचे २५ आमदार नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या आमदारांचा समावेश होता.
राज्यातील निधीवाटपात राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वाधिक वाटा मिळत असताना शिवसेनेच्या आमदारांना मात्र निधीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आमदारांची भेट घेऊन समजूत काढली होती. त्यामुळे या आमदारांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची अस्वस्थता अद्यापही कायम आहे.
25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve
महत्त्वाच्या बातम्या
- पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या पुढे जाता आले नाही, गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका
- पी. चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर निशाणा, पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणुका एकाच वेळी लढवू नका असे सांगूनही ऐकले नाही
- नागालॅँडमध्ये भाजपा रचणार इतिहास, राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी एका महिलेला उमेदवारी दिली आहे.
- अमेठीत होळीच्या मारामारीत आठ जण जखमी दोघे मृत; दोन गंभीर जखमीं