वृत्तसंस्था
मुंबई – कोकणातील अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 हजार 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. 2200 ST buses of for passengers going to Konkan for Ganpati Utsav
मुंबईतून निघणाऱ्या या एसटी गाड्या थेट चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडणार आहेत. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
2200 ST buses of for passengers going to Konkan for Ganpati Utsav
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी प्रशांत किशोरांकडून विरोधकांची जमवाजमव, राहुल गांधींशी बैठकीनंतर चर्चांनी धरला जोर
- फादर स्टेन स्वामींना नोबेल मिळावा, त्यांच्या राज्य प्रायोजित मृत्यूची सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी – ज्युलियो रिबेरो
- No miniti bank or pigy bank its Modi bank; लहान मुलांना बचती सवय लावण्यासाठी बिहारमध्ये कारागिराने घडविली मोदी बँक
- ओढून ताणून आणा, पटोले नाना…!!; पवारांनी छोटा माणूस म्हटलेल्या नानांना सामनातूनही कानपिचक्या
- शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीला टांगला; भाजपाचे शिवराय कुळकर्णी यांचा सरकारवर आरोप