• Download App
    दिवाळीच्या तोंडावर २० रेल्वे गाड्या रद्द; अमरावतीत बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने निर्णय । 20 trains canceled on Diwali; Decision to undertake repair work of Badnera Railway Depot in Amravati

    दिवाळीच्या तोंडावर २० रेल्वे गाड्या रद्द; अमरावतीत बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने निर्णय

    वृत्तसंस्था

    अमरावती : ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती शहराजवळील बडनेरा रेल्वे जंक्शन इथं गुडस वॅगन रिपेअर डेपो लाईनच्या कामानिमित्त रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होणार आहे. 20 trains canceled on Diwali; Decision to undertake repair work of Badnera Railway Depot in Amravati

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. मात्र याच काळात बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या गाड्या रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांना आता एसटी बसचा किंवा खासगी वाहतुकीचा उपयोग करावा लागणार आहेत.



    कोणत्या रेल्वे गाड्या होणार रद्द?

    ब्लॉकमुळे २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी धावणारी मुंबई-अमरावती एक्‍सप्रेस, याच तारखेला धावणारी अमरावती-मुंबई एक्‍सप्रेस, २७ ऑक्टोबरची पुणे-अमरावती एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबरची अमरावती-पुणे एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची नागपूर- सीएसएमटी एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-सीएसएमटी एक्‍सप्रेस, ३० ऑक्टोबरची पुणे – नागपूर एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबरची पुणे-नागपूर एक्‍सप्रेस आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

    20 trains canceled on Diwali ; Decision to undertake repair work of Badnera Railway Depot in Amravati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ