• Download App
    मुहूर्त ठरला : मार्चमध्ये होणार १८ महापालिकांच्या निवडणुका, १ फेब्रुवारीपासून आचारसंहिता, मुंबई-औरंगाबाद वगळल्याची चर्चा । 18 municipal elections to be held in March, discussion on exclusion of Mumbai-Aurangabad

    मुहूर्त ठरला : मार्चमध्ये होणार १८ महापालिकांच्या निवडणुका, १ फेब्रुवारीपासून आचारसंहिता, मुंबई-औरंगाबाद वगळल्याची चर्चा

    कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये होतील. राज्य निवडणूक आयोगाने यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. 18 municipal elections to be held in March, discussion on exclusion of Mumbai-Aurangabad


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये होतील. राज्य निवडणूक आयोगाने यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.



    राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महापालिकांना 7 जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, या आदेशात औरंगाबाद आणि मुंबई महापालिकांबाबत कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया लांबल्याची चर्चा सुरू झाली आहे. मार्चमध्ये निवडणुका होणार असतील तर 1 फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    या महापालिकांमध्ये निवडणुकीची शक्यता

    कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे महापालिकेत मार्चमध्ये निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

    18 municipal elections to be held in March, discussion on exclusion of Mumbai-Aurangabad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य