• Download App
    बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग17 yrs girl molested in PMT Bus, police Arrested the bus conducter

    बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग

    बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीला बस मध्ये बसच्या कंडक्टरने जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे -बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीला बस मध्ये बसच्या कंडक्टरने जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडित मुलीने पाेलीसांकडे तक्रार दिल्यानंतर, पीएमटीचा कंडक्टर प्रशांत किसन गाेडगे (रा.कात्रज,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. 17 yrs girl molested in PMT Bus, police Arrested the bus conducter

    पिडित मुलगी ही २८ मार्च राेजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ते पुणे या बसने वेस्टेन्ड थिअेटर ते विश्रांतवाडी,पुणे असा प्रवास करत हाेती. त्यावेळी बस मध्ये गर्दी असल्याने अल्पवयीन मुलगी बस मध्ये उभी राहून प्रवास करत हाेती. त्यावेळी बस मधील कंडक्टर तिच्या जवळ येऊन तिला खेटुन उभार राहिला, त्यावर मुलीने त्यास ‘तुला बाजुला उभा राहण्यास जागा नाही काय?’ असे रागावून म्हणाली.

    तसेच बस मध्ये तिकिट चेकअर आल्यानंतर तिने याबाबतची तक्रार त्यांच्याकडेही केली. याचा राग मनात धरुन बस कंडक्टर प्रशांत गाेडगे याने तिच्याकडे रागाने पाहून डाेळे वटारुन पाहुन तिच्या कमरेला तीन वेळा हात लावून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पाेलीसांनी आराेपीला अटक करुन त्याच्याकडे चाैकशी सुरु केली आहे. याबाबत बंडगार्डन पाेलीस पुढील तपास करत आहे.

    17 yrs girl molested in PMT Bus, police Arrested the bus conducter

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!