विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्रातून जवळपास 2000 च्या वर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर कोल्हापूरमध्ये 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा डेपोत मधील एकूण 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
15 ST employees in Kolhapur suspended
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रायव्हेट बस वापरण्यावर लोक भर देत आहेत. यावेळी प्रायव्हेट बस ओनर्सनी त्यांचे दर मूळ किमतीच्या दुपटीपेक्षाही अधिक वाढवले आहेत. त्यामुळे आरटीओ द्वारे प्रायव्हेट बस चालकांनी अधिक दार आकारल्यास कारवाई करणार असा इशारा देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र सरकारने बस तिकिटाच्या 1.5 पट किंमत आकारण्याची परवानगी प्रायव्हेट बसचालकांना दिली आहे. यापेक्षा जास्त कोणी जर पैसे आकारत असतील तर त्याची तक्रार खाली दिलेल्या नंबरवर किंवा खाली दिलेल्या इमेलवर मेल करून करण्यात यावी. असे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर दीपक पाटील यांनी सांगितले आहे.
नंबर : 0231-2663131
इमेल : mh09@mahatranscom.in
कोल्हापूर आरटीओ विभाग प्रायव्हेट बसेस वर करणार कारवाई
कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. सचिंद्रनाथ कांबळे (हेड ऑफ प्रायव्हेट बस ऑपरेटर्स असोसिएशन) यांनी बोलताना सांगितले, सरकार तर्फे प्रायव्हेट बसेस पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी देण्यात यावित यासाठी दबाव टाकला जात आहे. पण आम्ही आमच्या बस देणार नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या अांदाेलनात सहभागी आहोत.
15 ST employees in Kolhapur suspended
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!