प्रतिनिधी
मुंबई : मार्डने महाराष्ट्रात पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील 1 हजार 432 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे. 1432 Senior Resident Doctor posts sanctioned in Maharashtra; Shinde-Fadnavis government’s decision
अवघ्या दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात यावी ही देखील या डॉक्टरांनी प्रमुख मागणी होती. संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांसोबत चर्चा करून दोन दिवसांत राज्यातील निवासी डॉक्टरांची 1432 रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने आज ही रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे.
डॉक्टरांच्या मागण्या
1,432 एसआर पदांची निर्मिती, वसतिगृहांची दुरूस्ती, वसतिगृहांची क्षमता वाढवणे, महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरा, यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. यातील निवारी डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.
माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने या बाबतचा निर्णय घेतला आहे.
1432 Senior Resident Doctor posts sanctioned in Maharashtra; Shinde-Fadnavis government’s decision
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांचा कोठडीतला मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
- आटपाडीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या डॉ. संजय गेळेला अटक; पत्नी अश्विनी गेळे फरार
- छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच!!; “पानिपत”, “नेताजी”कार विश्वास पाटलांचा निर्वाळा
- अयोध्येत उभे राहणार महाराष्ट्र भवन; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा होकार
- राजौरीत हिंदूंचे हत्याकांड घडवणाऱ्या ISI च्या 2 दहशतवाद्यांचा पाकिस्तानातच खात्मा!