विशेष प्रतिनिधी
बीड : दुचाकी, मोबाईल यासह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील.मात्र बीडच्या परळी शहरातून चक्क १४० गाढवे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शहरात घडला आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 140 donkeys stolen from Parli Complaint lodged at Sambhajinagar police station
परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार आणि वडार समाजाकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून एक एक करत तब्बल १४० गाढवे चोरीला गेली आहेत. या संदर्भात संभाजीनगर पोलिस ठाण्यात गाढवांच्या मालकांनी धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, काम नसले की, ही गाढवे शहरात सोडून दिली जातात. जेव्हा कामाची गरज लागेल तेव्हा त्यांचा शोध मालकांकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांनी गाढवांची खरेदी कुणाकडे केली होती? आणि त्याचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यासाठी मदत होईल. त्या मदतीच्या आधारे शोध घेतला जाईल. दरम्यान, या प्रकरणात खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती देऊन शोध सुरू आल्याचे सांगितले आहे.
140 donkeys stolen from Parli Complaint lodged at Sambhajinagar police station
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द