विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वतुर्ळात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळातील १३ मंत्री तर जवळपास ७० आमदारांना संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.13 ministers and 70 MLAs are corona positive
मंत्री आणि अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली आहे. दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. कोरोनाची साथ आल्यापासून मंत्रिमंडळ बैठकीचे ठिकाण मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.
आतापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींना कोरोना संसर्ग झाला आहे.
खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, राजन विचारे तसेच आमदार सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील, इंद्रनील नाईक, नीलय नाईक, माधुरी मिसाळ, रोहित पवार, प्रताप सरनाईक आदींना कोरोनाची बाधा झाली आहे.
13 ministers and 70 MLAs are corona positive
महत्त्वाच्या बातम्या
- भाऊरायांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ममता बॅनर्जींनी वहिनीसाहेबांना आणले राजकारणात
- डिजीटल इंडियाचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार ,अर्थव्यवहारांसाठी यूपीआयचा पर्याय, ४५६ कोटी व्यवहारांची वर्षात नोंद
- बबूआ रंग बदलू लागला, दंगली घडविणाऱ्यांच्या स्वप्नात आता देव येऊ लागले, योगी आदित्यनाथ यांची अखिलेश यादवांवर टीका
- SINDHUTAI SAPKAL : अनाथांची आई सर्वांची लाडकी माई ! पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक;वाहिली श्रद्धांजली …