वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करत तब्ब्ल 12 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 5.38 कोटी रुपये आहे. यावेळी कस्टम विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकासह सहा जणांना अटक केली. 12 kg gold seized at Mumbai airport
या सगळ्यांनी खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून सोने तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विमानतळावरील कस्टम विभागाने शिताफीने कारवाई करून सोने जप्त केले आणि एका सुदानी नागरिकाला अटक केली. यावेळी काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी गोंधळ घातला. मात्र, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सोने तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकासह सहा जणांना अटक केली.
एका कस्टम अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सीमाशुल्क कायद्याच्या कलम ११० अंतर्गत जप्त केला आहे. या संदर्भात सोन्याच्या तस्करीचा गुन्हा केला. मुंबई विमानतळावर उत्तर आफ्रिकेकडील देश सुदान येथील नागरिकाकडून १२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या नागरिकाला इतर पाच जणांना सुरक्षा यंत्रणांपासून वाचत सोने तस्करी करण्यास मदत केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
12 kg gold seized at Mumbai airport
महत्वाच्या बातम्या
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा
- अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा
- नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!
- महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय