• Download App
    भाजपच्या निलंबित १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच, विधानसभा अध्यक्षांच्या निलंबन आदेशाला स्थगितीस नकार । 12 BJP MLAs got a setback from the Supreme Court, refused to stay the order related to the speaker's suspension

    भाजपच्या निलंबित १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच, विधानसभा अध्यक्षांच्या निलंबन आदेशाला स्थगितीस नकार

    12 BJP MLAs : राज्याच्या विधानसभेतील भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाकडून अंतरिम दिलासा न मिळाल्याने आता आमदारांना चालू अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. मात्र, न्यायालयाने विधानसभा सचिवांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. 12 BJP MLAs got a setback from the Supreme Court, refused to stay the order related to the speaker’s suspension


    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्याच्या विधानसभेतील भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाकडून अंतरिम दिलासा न मिळाल्याने आता आमदारांना चालू अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. मात्र, न्यायालयाने विधानसभा सचिवांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.

    जुलै महिन्यात राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तनाचा ठपका ठेवून भाजपच्या १२ आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, इकडे संसदेतही 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

    या १२ आमदारांचे निलंबन

    भाजपच्या १२ आमदारांना तालिका अध्यक्ष (सध्या सभापती पद रिक्त आहे) भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, नारायण कुचे, आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, कीर्तिकुमार बगाडिया अशी निलंबित करण्यात आलेल्या भाजप आमदारांची नावे आहेत. भाजप आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी आणला होता. तो आवाजी मतदानाने मान्य करण्यात आला. यानंतर आमदारांनी सभापतींच्या निलंबनाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    12 BJP MLAs got a setback from the Supreme Court, refused to stay the order related to the speaker’s suspension

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!