प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक समोर आंदोलन करणाऱ्या 118 एसटी कर्मचाऱ्यांना अधिक बडतर्फ करण्यात आले होते. परंतु शिंदे – फडणवीस सरकारने त्यांना पुन्हा एसटीच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 118 dismissed ST employees protesting in front of Sharad Pawar’s Silver Oak back in service
एसटी कर्मचाऱ्यांचा मागील आठवड्यात तीन महिने संप सुरू होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हा संप सुरू होता. मात्र त्यावेळी ठाकरे – पवार सरकारने ही मागणी मान्य केली नाही, त्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कारणीभूत आहेत, असा आरोप करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानातून थेट सिल्व्हर ओक येथील शरद पवारांचे निवासस्थान गाठून तिथे कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे 118 कर्मचाऱ्यांना ठाकरे – पवार सरकारने बडतर्फ केले होते. त्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी, 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा एसटीने सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संतप्त एसटी कामगारांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक केली होती. त्यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 109 एसटी कामगारांना अटक केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी सविस्तर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल केले. त्याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पुढे एक महिन्याच्या कालावधीत त्यांना जामीन मिळाला. आता शिंदे – फडणवीस सरकारने त्यांना पुन्हा एसटीच्या सेवेत सामावून घेतले आहे.
118 dismissed ST employees protesting in front of Sharad Pawar’s Silver Oak back in service
महत्वाच्या बातम्या
- चर्चा झाली दसरा मेळाव्यांच्या गर्दीची, पण त्यापलिकडे महागर्दी जमली होती मराठी गरब्याला!!… त्याचे काय?
- Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो Annie Ernaux यांना साहित्यातील नोबेल जाहीर
- दसरा मेळावे संपले; पण माध्यमांचे लळीत शेपटासारखे लांबले!
- निरागस चिमुकल्यावर घाणेरडी टीका करणारे तुम्ही कसले कुटुंबप्रमुख..? खासदार श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र