• Download App
    ठाकरे - पवार सरकारमध्ये रखड(व)लेल्या मेट्रो 3 च्या मूळ खर्चात 10000 कोटींची वाढ!!10,000 crore increase in the original cost of Metro 3 stalled in the Thackeray-Pawar government

    ठाकरे – पवार सरकारमध्ये रखड(व)लेल्या मेट्रो 3 च्या मूळ खर्चात 10000 कोटींची वाढ!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कुलाबा – वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बुधवारी झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता, तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख इतका होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता शिंदे फडणवीस सरकार विनंती करणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली आहे. 10,000 crore increase in the original cost of Metro 3 stalled in the Thackeray-Pawar government

    मेट्रो कार शेड आरे मध्ये बांधावी की कांजुरमार्गला?, या ठाकरे पवार सरकारच्या काळात घातलेल्या वादामुळे मूळ प्रकल्पाच्या खर्चात गेल्या अडीच वर्षात ही 10000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


    मेट्रो ऑन फास्टट्रॅक : अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी!!


     

    सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाखांवरून ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख इतकी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले आहेत. या सुधारित वित्तीय आराखड्यानुसार, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले असून, वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

    बोगद्यांचे ९८.६ % काम पूर्ण

    मुंबई मेट्रो मार्ग-३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून, हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून, वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतर ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.

    सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के काम झाले असून, भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमीन आणि २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

    10,000 crore increase in the original cost of Metro 3 stalled in the Thackeray-Pawar government

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस