विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्यांना आपल्या पक्षाचे 10 खासदार कधी निवडून आणता आले नाहीत ते 300 खासदारांच्या नेत्याला काय आव्हान देणार?!!, अशा शेलक्या शब्दांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खिल्ली उडवली आहे. 10 MPs who have never been elected will challenge the leaders of 300 MPs !!; Nilesh Rane’s attack
शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले होते, त्यावर टीका करताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. ज्यांना कधी १० खासदार निवडून आणता आले नाही, ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचे नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा? अशा शब्दांत निलेश राणे यांनी आव्हान दिले आहे.
विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शरद पवार म्हणाले होते की, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे असेल तर मतदारांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेच आहे. यासाठी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी करतील किंवा कोणी आणखी नेता हे महत्त्वाचे नाही. सद्यस्थितीत विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनत विविध पक्षांशी चर्चा होईल, असे शरद पवार म्हणाले होते.
10 MPs who have never been elected will challenge the leaders of 300 MPs !!; Nilesh Rane’s attack
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी