विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन 10 लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने 10 लाख रुपये घेऊन पुन्हा 2 लाखाची खंडणी मागितली. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर त्याच्या साथिदारावर गुन्हा दाखल केला आहे.10 lakh ransom demanded from engineering student, accused handcuffed
अमर सूर्यकांत पोळ (रा. अहमदपूर जि. लातूर ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याचा साथिदार करण मधुकर कोकणे (रा. अमरकुंज सोसायटी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 23 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. एका मित्राद्वारे त्याची अमोर पोळ याच्यासोबत ओळख झाली. त्याने डिसेंबर 2019 मध्ये सोशल मीडियाच्या व्यावसायासाठी ऑफिस सुरु करण्यासाठी फिर्यादीकडे 50 लाख रुपये मागितले. त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला.
पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी पोळ याने ‘तू आम्हाला पैसे का देत नाही, तुला आम्ही पैसे मागतोय ते समजत नाही का, तुला तुझा जीव महत्त्वाचा वाटत नाही का, तुला पैसे द्यायचे नाही का, तुला पुण्यात शिक्षण करु देणार नाही. तुला संपवून टाकू’ अशी धमकी दिली.
आरोपी पोळ याने फिर्यादी कडून पाच लाख रुपये घेतले. तसेच त्याचा साथिदार करण कोकणे याने आणखी एका तरुणाकडून पाच लाख रुपये घेतले. काही दिवसांनी पैसे परत करण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. त्यानंतर पैसे मागिल्यावर त्यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली.
त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अमर पोळ याला अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव करीत आहेत.
10 lakh ransom demanded from engineering student, accused handcuffed
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक तुरूंगात, तर अजितदादा पवार बाहेर कसे??; असदुद्दीन ओवैसी यांचा उत्तर प्रदेशातून खोचक सवाल!!
- Lavasa lake city : लवासा प्रकरणी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरचे आरोप खरेच!!; मुंबई हायकोर्टाचे कडक ताशेरे; पण…
- मराठा आरक्षण : ठाकरे – पवार सरकारचा उंदीर – मांजराचा राजकीय खेळ चालू आहे का??
- Maratha reservation : संभाजीराजेंना उपोषण करायला लागणे हा काळा दिवस, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर