• Download App
    अमृता फडणवीसांना १ कोटीची लाच ऑफर अन् धमकी; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा दाखल!1 Crore bribe offer and threat to Amrita Fadnavis A case has been filed against the designer in Mumbai

    अमृता फडणवीसांना १ कोटीची लाच ऑफर अन् धमकी; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा दाखल!

    जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

    प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनक घटना घडली आहे. त्यांना तब्बल १ कोटींची लाच ऑफर करून, धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंबईतील एका महिला डिझायनर व तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 Crore bribe offer and threat to Amrita Fadnavis A case has been filed against the designer in Mumbai

    Surekha Yadav : मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी केलं ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे सारथ्य; ठरल्या आशियातील पहिल्या महिला ‘लोको पायलट’

    अमृता फडणवीसांनी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरूद्ध मुंबई पोलिसांत धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली आहे. तसेच, १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

    या महिला डिझायरने अमृता फडणवीस यांना विशिष्ट स्वरूपाची माहिती पुरवण्यासाठी आणि वडिलांविरुद्ध असलेला गुन्हा कुमकुमत करण्यासाठी १ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती.  एफआयआरनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

    1 Crore bribe offer and threat to Amrita Fadnavis A case has been filed against the designer in Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!