प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्यापर्यंत वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरचे प्रकल्प मुंबईत येणार असे अंतिम झाले होते, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व चर्चा झाली होती, मात्र अचानक १.५४ लाख कोटींचे हे प्रकल्प गुजरातला गेले, असा आरोप युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला. 1.54 lakh crore project of Maharashtra went to Gujarat; Aditya Thackeray says
गुजरातला जमले महाराष्ट्राला का नाही?
मागील वर्षी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई हे जेव्हा दावोसला वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या बैठकीला गेले होते, तेव्हा वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी त्यांचा उद्योग महाराष्ट्रात आणणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा या उद्योगासाठी तळेगाव येथे जमीन देण्याचेही ठरले होते.
केवळ कागदोपत्री काम बाकी होते, असे असताना सरकार बदलताच हे उद्योग थेट गुजरातला कसे गेले?, याचे उत्तर “खऱ्या मुख्यमंत्र्यांनी” (म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी) असा टोला आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचे दु:ख नाही. पण ही कंपनी महाराष्ट्रात 95 % येणार होती. पण अचानक ती गुजरातला का गेली?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
या उद्योगाच्या संबंधी १६० इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून ७० हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार होती, असेही त्यांनी सांगितले आहे. गुजरात सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे अभिनंदन पण मग महाराष्ट्र जी यंत्रणा होती, तिने यात का काही केले नाही?, याचे उत्तर “खऱ्या मुख्यमंत्र्यांनी” (देवेंद्र फडणवीस) यांनी द्यावे, असे शरसंधान आदित्य ठाकरे यांनी साधले आहे.
1.54 lakh crore project of Maharashtra went to Gujarat; Aditya Thackeray says
महत्वाच्या बातम्या