प्रतिनिधी
सातारा : ‘संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन’ असा इशारा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून दिला आहे. उदयराजे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली.I will show you how to stop Sanjay Raut’s breathing, MP Udayan Raje Bhosale’s warning
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत एक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टवर भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती घराण्यातील वारसदार उदयनराजे भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, महाराष्ट्र केसरीमधील विजेत्यांचा सत्कार करताना उदयनराजे भोसले हे संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
‘संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन’ अशी धमकीच उदयनराजे यांनी स्टेजवरून दिली. आता या धमकीचे पडसाद मात्र राजकीय पटलावर चांगलेच उमटतील असे दिसत असून यावर संजय राऊत नेमकी काय भूमिका घेतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपविजेता प्रकाश बनकर यांचा आणि इतर गटातील विजेत्या पहिलवानांचा सत्काराचा कार्यक्रम भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे करण्यात आला. यावेळी उदयनराजेंच्या हस्ते पहिलवान पृथ्वीराज पाटील यांना बुलेट देण्यात आली. तर प्रकाश बनकर यांना होंडा युनिकॉर्न ही गाडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात संपन्न झाल्यानंतर उदयनराजे मित्र परिवाराकडून ही बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
या बक्षिसाचा कार्यक्रम काल तीन महिन्यानंतर जलमंदिरात घेण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्याचे कंदी पेढेही भरवण्यात आले. जी बुलेट पहिलवान पृथ्वीराज पाटीलला देण्यात आली. तिला 007 हा खास नंबरही उदयनराजेंनी घेऊन दिला.
I will show you how to stop Sanjay Raut’s breathing, MP Udayan Raje Bhosale’s warning
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : मतांचा घटला “कोटा”; कोणाचा फायदा, कोणाचा तोटा??
- केसीआर-ओवेसींच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची मोहीम : हैदराबादेत 2-3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2024ची रणनीती ठरणार
- मान्सून 2 दिवसांत महाराष्ट्रात; उत्तर महाराष्ट्रासह बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस!!
- भारताविरुद्ध पाकिस्तानात बसून कट रचतेय SJF, ‘खलिस्तानी नकाशा’चे अनावरण, शिमल्याला दाखवले राजधानी