विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यात पुणे जिल्हा परिषदेसह पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा समावेश आहे. ZP- Panchayat Samiti election
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. संबंधित मतदार स्वतःचे नाव, पत्ता, मतदार क्रमांक इत्यादी तपशील तपासून दुरुस्तीची मागणी करू शकतील. आयोगाने स्पष्ट केले आहे की, विधानसभेच्या मतदार याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू राहतील आणि त्यानुसार प्रभागांमध्ये विभागणी केली जाईल.
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. यामध्ये सर्व हरकती व सुचना विचारात घेऊन दुरुस्त्या समाविष्ट केल्या जातील.
महापालिकांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रथम पार पडतील, हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, गट-गणनिहाय आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणुका घेण्यास कोणताही कायदेशीर अडथळा राहिलेला नाही.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्येच संपला होता. तेव्हापासून या संस्थांमध्ये प्रशासकाची नेमणूक आहे. त्यानंतर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत, तर नागरिकांच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद मिळालेला नाही.
या निवडणुकीत मतदारांची जबाबदारी मोठी आहे. मतदार याद्यांमध्ये नाव निश्चित करणे, दुरुस्ती करणे आणि मतदानाच्या दिवशी हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे निवडणूक आयोगाने आवर्जून सांगितले आहे.
ZP- Panchayat Samiti election trumpet, voter list program announced
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत + चीन आणि सगळ्या युरोप वर प्रचंड आगपाखड!!
- Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक, 80 लाखांचे इनाम असलेले 2 नक्षली ठार; मृतदेह आणि AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त
- ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- Syria : 58 वर्षांनंतर सीरिया संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होणार; राष्ट्राध्यक्ष अल-शारा न्यूयॉर्कमध्ये पोहोचले