विशेष प्रतिनिधी
मुंबई : नगरपालिका, महापालिका निवडणुकांनंतर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होणार आहे. आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदांच्या आणि 125 पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
निवडणूक अर्ज करायची तारीख : 16 जानेवारी ते 21 जानेवारी
उमेदवारी अर्जांची छाननी : 22 जानेवारी 2026
अर्ज माघारीची अंतिम मुदत : 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप : 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर
मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता पासून
दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्हा परिषद
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. एकीकडे राज्यात 5 फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10.00 वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
Zila Parishad Election Declared
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या तथाकथित “गेमचेंजर” डावात फडणवीसांनी मारली पाचर; मेट्रोच्या फुकट प्रवासाची केली पोलखोल!!
- व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे, अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!
- मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी; विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?
- अजितदादांच्या तथाकथित “गेमचेंजर” डावात फडणवीसांनी मारली पाचर; मेट्रोच्या फुकट प्रवासाची केली पोलखोल!!