• Download App
    झी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी फेडले ९१ टक्के कर्ज, आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची आली होती वेळ|Zee Group Chairman Subhash Chandra repaid 91 per cent of the loan, due to financial difficulties, it was time for bankruptcy

    झी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी फेडले ९१ टक्के कर्ज, आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची आली होती वेळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची वेळ आलेल्या झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र यांनी आपल्यवरील ९१ टक्के कर्जे चुकावली आहेत. उर्वरित कर्ज लवकरच फेडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.Zee Group Chairman Subhash Chandra repaid 91 per cent of the loan, due to financial difficulties, it was time for bankruptcy

    डॉ सुभाष चंद्रा यांनी एक खुले पत्र जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या कर्ज निवारण प्रक्रियेचा तपशील आणि सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी उचललेल्या पावसलांची माहिती दिली. चंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांनी ४१ सावकारांचे ९१ टक्यांहून अधिक कर्ज परत दिले आहे.



    यापूर्वी 25 जानेवारी 2019 रोजी चंद्रा यांनी खुले पत्र जारी केले होते. त्यामध्ये आयएल अँड एफएस प्रकरणामुळे निर्माण झालेल्या तरलता संकटामुळे कर्जदारांना होणाºया त्रासाबद्दल क्षमा मागितली होती. आपली सर्व क्षमता वापरून कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले होते.

    आता लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की कोरोनाच्या साथीमुळे मालमत्ता विभाजन प्रक्रियेला धक्का बसला आहे. आमच्या एकूण कर्जाच्या 91.2 टक्के रक्कम 110 कर्जदारांना परत देण्यात आली आहे. यासाठी कुटुंबाच्य पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा आणि प्रिंट मीडिया व्यवसायातून बाहेर पडावे लागले. प्रमुख व्यवसायातील हिस्सा विकावा लागला आहे. परंतु, कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी हे केले आहे.

    चंद्रा यांनी आता नवीन उद्योगात पाऊल टाकण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की व्हिडीओ व्यवसायात मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे आता डिजीटल व्हिडीओ क्षेत्रात आपण उतरणार आहोत. त्याचबरोबर मशीन लर्नींग आणि कृत्रिम बुध्दीमत्ता या व्यवसायातही नवीन संधी शोधत आहे. याबाबतचा तपशील लवकरच देणार आहे.

    Zee Group Chairman Subhash Chandra repaid 91 per cent of the loan, due to financial difficulties, it was time for bankruptcy

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस