• Download App
    देशाची अर्थव्यवस्था शिखरावर नेण्यासाठी तरुणांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार - देवेंद्र फडणवीस|Youth will have to play an important role to take the countrys economy to its peak Devendra Fadnavis

    देशाची अर्थव्यवस्था शिखरावर नेण्यासाठी तरुणांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार – देवेंद्र फडणवीस

    अमृत कालमध्ये भारताला सशक्त, स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार होई, असा विश्वासही व्यक्त केला.


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मनी बी इन्स्टिट्यूटने नागपुरात आयोजित केलेल्या ‘अमृतकाल – व्हिज्युअलायझिंग इंडिया @ 100’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यादरम्यान संस्थेचा ‘AI.Algo’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयोजक शिवानी दाणी, एस. पी. तुलसीयन, विजय केडीया आदींचीही उपस्थित होती.Youth will have to play an important role to take the countrys economy to its peak Devendra Fadnavis

    याप्रसंगी फडणवी म्हणाले, भारत झपाट्याने विकसित होत असून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. सध्या, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये 2030 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे.



    याचबरोबर गरीब कल्याण अजेंडा ने गरीब आणि अर्थव्यवस्था या दोघांचा विकास होणार आहे. गेल्या 9 वर्षात 25 कोटी लोक गरिबीच्या दलदलीतून बाहेर आले आहेत. प्रगत राष्ट्र होण्यासाठी लोकसंख्या, लोकशाही खूप महत्त्वाची आहे. असंही त्यांनी सांगितलं.

    याशिवाय स्वातंत्र्याचे अमर युग सुरू झाले आहे. येत्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था शिखरावर नेण्यासाठी तरुणांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार करुन आपल्याला पुढे जावे लागेल. असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.

    Youth will have to play an important role to take the countrys economy to its peak Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस