दारूसाठी पैसे मागितल्याच्या रागातून एकाने तरूणाला दांडक्याने बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना २८ मार्चला वाघोलीनजीक आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. Youth demanded money for alcohol another friend murder him in wagholi area
विशेष प्रतिनिधी
पुणे : दारूसाठी पैसे मागितल्याच्या रागातून एकाने तरूणाला दांडक्याने बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना वाघोलीनजीक आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ससून रूग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संजयकुमार श्रीसुरजप्रसाद चौधरी (वय २८, रा. गाडेवस्ती, वाघोली,मूळ- जालोन, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. सागर मोहित (रा. वाघोली बाजारतळ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे यांनी फिर्याद दिली आहे.
सागर आणि संजयकुमार एकाच परिसरात राहायला असून त्यांची ओळख होती. त्यामुळे दोघेही मद्यप्राशन करण्यासाठी एकत्रित जात होते. काही दिवसांपासून संजयकुमार हा सातत्याने सागरकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. त्याच रागातून २८ मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सागरने संजयकुमारला दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या संजयकुमारला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे तपास करीत आहेत.
Youth demanded money for alcohol another friend murder him in wagholi area
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात महिला पोलिस हवालदाराची पाच किलोमीटर पायपीट
- पंजाबमध्ये गव्हाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; १७ लाखांचे होते कर्ज
- मुंबई पालिकेसाठी लागलीये सगळी “बेट”; मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब “फायर आजी”ची भेट!!
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण ही तर जनभावना!!; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य