• Download App
    MPSC वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी तरूणास अटक; ९४ हजारांहून अधिक उमेदवारांचा तपशील कॉपी केला Youth arrested for hacking MPSC website

    MPSC वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी तरूणास अटक; ९४ हजारांहून अधिक उमेदवारांचा तपशील कॉपी केला

    maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai

    घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर जप्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वेबसाईट हॅक करून गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेच्या उमेदवारांचे हॉल तिकीट तपशील (रोल क्रमांक) काढल्याप्रकरणी, नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुण्यातून आरोपीचे नाव रोहित कांबळे या १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Youth arrested for hacking MPSC website

    नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, तरुणाला त्याच्या चिखली येथील घरावर छापा टाकून अटक करण्यात आली. छाप्यात त्याच्या घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर सापडले.

    आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एमपीएससीने या वर्षी 20 एप्रिल रोजी उमेदवारांना हॉल तिकीट मिळविण्यासाठी आपल्या वेबसाइटवर एक बाह्य लिंक दिली होती आणि आरोपीने ही लिंक हॅक केली आणि तेथून 94,195 उमेदवारांचे तपशील कॉपी केले, शिवाय ‘MPSC 2023-A’ नामक टेलिग्राम चॅनेलवर बेकायदेशीरपणे शेअर केले.

    तसेच ते म्हणाले की, एमपीएससी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेलकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    Youth arrested for hacking MPSC website

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार