काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,’असंही ओवैसी म्हणाले.Your soldiers are being martyred on the border and you will play India-Pakistan T20? Asaduddin Owaisi’s attack on Modi
विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : AIMIM चे नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,’असंही ओवैसी म्हणाले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी येणाऱ्या टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी ओवैसी म्हणाले की , एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले तर दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे.
यादरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणाले होते की , सैनिक मरत आहे आणि मनमोहन सिंग सरकार बिर्याणी खाऊ घालत आहे. आणि आता हेच नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये आपले 9 सैनिक शहीद होतात आणि तुम्ही टी-20 खेळवणार? असंही ओवैसी म्हणाले.
Your soldiers are being martyred on the border and you will play India-Pakistan T20? Asaduddin Owaisi’s attack on Modi
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल्स : एक मिनिटाचा स्ट्रेच व्यायामप्रकारही शरीरासाठी मोलाचा
- हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या ; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठविले पत्र
- T20 World Cup : विराट कोहली म्हणाला – ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’…काय आहे कारण?
- पुण्यात उपायुक्ताला १ लाख ९० हजारांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई