वृत्तसंस्था
मुंबई : मैत्रिणीबरोबर विकेंड पार्टी करणाऱ्या एका तरुणीने ऑनलाइन दारू मागविली होती. परंतु, तिला एका बाटलीभर दारूसाठी ६१ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना घडली आहे. young woman Purchased Liquor On-line ; But She Was Cheated For 61,000 Rs
तरुणीनं ऑनलाइन संकेतस्थळाचा वापर करून दारू मागवली होती. तसायबर भामट्यानं १७२० रुपयांचा क्युआर कोड पाठवला होता. पण २तास उलटूनही दारू घरपोच झाली नाही. त्यामुळे संपर्क साधला असता. आरोपींनी तिला बोलण्यात गुंतवून ६१ हजारांची फसवणूक केली आहे.
दक्षिण मुंबईत राहाणाऱ्या फिर्यादी तरुणीच्या घरी तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या. त्या घरात बसून पार्टी करणार होत्या. संकेतस्थळावरच्या मोबाइल नंबरवर संपर्क करून त्यांनी ऑनलाइन खरेदी केली. त्यांच्या मद्याचं एकूण बील १७२० रुपये झालं होतं. त्याप्रमाणे आरोपी तरुणानं बिलासाठी क्युआर कोड पाठवला. तरुणींनंही डोळे झाकून विश्वास ठेवत क्युआर कोड स्कॅन करत बिलाची रक्कम अदा केली.
दोन तास उलटूनही दारू घरपोच न मिळाल्याने फिर्यादी तरुणीनं पुन्हा त्याच क्रमांकावर संपर्क साधला आणि पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं फिर्यादी तरुणीला बोलण्यात गुंतवलं. दरम्यान संबंधित सायबर चोरट्यानं तरुणीला १९८०१ रुपयांचे तीन व्यवहार करण्यास भाग पाडलं. काही कळायच्या आत आरोपीने तिच्या अकाऊंटमधून ६१ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.
young woman Purchased Liquor On-line ; But She Was Cheated For 61,000 Rs
महत्त्वाच्या बातम्या
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर
- पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत : च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम
- महाराष्ट्रातील ५ झेडपी निवडणूकांविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा