• Download App
    ठाण्यात बनावट कोविड प्रमाणपत्र विकणाऱ्या तरुणाला अटक , ७०० रुपयांत बनवायचा बनावट प्रमाणपत्र|Young man arrested for selling fake Kovid certificate in Thane

    ठाण्यात बनावट कोविड प्रमाणपत्र विकणाऱ्या तरुणाला अटक , ७०० रुपयांत बनवायचा बनावट प्रमाणपत्र

    नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.Young man arrested for selling fake Kovid certificate in Thane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीचा कोणताही डोस न घेता नागरिकांना अवघ्या ७०० रुपयांत दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विकणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली आहे.



    नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.त्याने अनेक नागरिकांना बनावट प्रमाणपत्र देत १५ हजार रुपये घेतले आहेत.

    याबाबत राबोडीतील फजलुर रहेमान शेख यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सौरब सिंग याला अटक केली असून पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक एस. आर. हुबे हे करीत आहेत.

    Young man arrested for selling fake Kovid certificate in Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!