• Download App
    तुम्ही 1857 ला इंग्रजांशी युती केली असेल; फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर You may have allied with the British in 1857

    Mercedes Baby : तुम्ही 1857 ला इंग्रजांशी युती केली असेल; फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. फडणवीसांचे 1857 च्या युद्धातही योगदान होते, असा टोला ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी जर त्यावेळी असेन तर मी नक्कीच तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढलो असेन. पण तुम्ही तेव्हाही इंग्रजांशीच युती केली असेल, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. You may have allied with the British in 1857

    – मर्सिडिस बेबी

    सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे “मर्सिडिस बेबी” आहेत, त्यांना ना कधी संघर्ष करावा लागला, ना कधी त्यांनी तो पाहिला. त्यामुळे कारसेवकांनी केलेल्या कार्याची ते थट्टा करू शकतात. पण माझ्यासारख्या लाखो कारसेवकांना गर्व आहे. ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला त्यावेळी मी तिथे होतो.

    “ते” 1857 ला शिपायांचे बंड मानतात

    मी हिंदू आहे, माझा मागील जन्मावरही विश्वास आहे पुनर्जन्मातही विश्वास आहे. त्यामुळे कदाचित मागच्या जन्मी मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेन. तुम्ही त्यावेळी सुद्धा इंग्रजांशीच युती केली असेल. कारण आता तुम्ही ज्यांच्याशी युती केली आहे ते 1857 ला स्वातंत्र्ययुद्ध नाही तर शिपायांचं बंड मानतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

    काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

    फडणवीसांचे 1857 च्या युद्धातही मोठे योगदान आहे. पण या वादामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. पण त्याही पुढे महाराष्ट्र आणि देशासमोर बेरोजगारी महागाई सारखे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पण एकीकडे महाविकास आघाडी सरकार विकासाची कामे करत असताना विरोधक वाद निर्माण करत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

    You may have allied with the British in 1857

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Manipur : मणिपूरमध्ये दोन महिन्यांत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, भाजप खासदाराचा दावा!

    Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज